वाक्प्रचार व अर्थ – मराठी व्याकरण Vakprachar ani arth marathi grammar

नमस्कार मित्रांनो, येथे तुम्हाला मराठी व्याकरणातील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ देण्यात आलेले आहेत. कुठेही नसतील तेवढे दिलेले आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक वाचा आणि या टॉपिक वर पैकी च्या पैकी गुण मिळवा.

आतल्या आत कुढणे – मनातल्या मनात दुख करणे
अभाळाल कवेत घेणे – मोठ काम साध्य करणे
बस्तान ठोकणे – मुक्काम ठोकणे
देणे घेणे नसणे – संबंध नसणे
डोक्यावर घेणे – अति लाड कारणे
जळफळाट होणे – रागाने लाल होणे
प्रतिबंध करणे – अटकाव करणे
तजविय करणे – तरतूद करणे
पाचवीला पूजणे – एखादी गोष्ट जन्मापासून असणे
माशी शिंकणे – असथडा येणे
सही ठोकणे – निश्चित करणे
उच्छाद मांडणे – धिंगाणा घालणे
हुडहुडी भरणे – थंडी भरणे
बाल लावणे – शक्ति खर्च करणे
अट्टहास करणे – आग्रह करणे
निष्प्रभ करणे – महत्व कमी करणे
पुनरुज्जीव करणे – पुन्हा उपयोगात आणणे
मनोरथ पूर्ण होणे – इच्छा पूर्ण होणे
अनानंद देणे – देऊन टाकणे
चित्त विचलित होणे – मूळ विषया कडून लक्ष्य दुसरीकडे जाणे
सख्य नसणे – प्रेमळ नाते नसणे
पिंक टाकणे – थुंकणे
नसती बिलमत येणे – नसती कटकट ओढवणे
काळीज उडणे – भीती वाटणे 
नाक मुठीत धरणे – आगतीक होणे
दातखिळा बसने – बोलती बंद करणे
हिसका दाखविणे –  बळ दाखऊन हिम्मत लक्षात आणून देणे
कानशीलांची भाजी होणे - गुच्च मारून मारून कानशीलांची आकार बदलणे
उताने पडणे – पराभूत होणे
उसने बळ आणणे – खोटी शक्ति दाखविणे
गाजावाजा करणे – प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे
मिनतवारी करणे – दादा-पुता करणे
रक्षणाची काळजी घेणे – योगक्षेम चालविणे
बारा गावाचे पानी पिणे – विविध प्रकारचे अनुभव घणे
वेसण घालणे – मर्यादा घालणे
साद घालणे – मनातल्या मनात दु:ख करणे
विदीर्ण होणे – भग्न होणे,मोडतोड होणे
संभ्रमित होणे – गोंधळणे
कूच करणे – वाटचाल करणे
अनभिज्ञ असणे – (एखाद्या विषयाचे) मुळीच ज्ञान नसणे
पळत ठेवणे  - लक्ष्य ठेवणे
ऊहापोह करणे – सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे
लाष्टक लावणे – झंझट लावणे,निकड लावणे
चाहूल लागणे – एखाद्याचे अस्तित्व जाणवणे
पडाव पडणे – वस्ती करणे
तगादा लावणे – पुनः पुन्हा मागणी करणे
खायचे वांधे होणे – उपासमार होणे,खायला न मिळणे
भंडाऊन सोडणे – त्रास देणे
कात्रीत सापडणे – दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे
सांजावणे – संध्याकाळ होणे
भाऊबंदकी असणे – नात्यानात्यात भांडण असणे
खितपट पडणे – क्षीण होत जाणे
उताणा पडणे – पराभूत होणे
उसने बळ आणणे – खोटी शक्ति दाखविणे
नूर पातळ होणे – रूप उतरणे
तोंड भरून बोलणे – खूप स्तुति करणे
वाचा बंद होणे – तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे
निक्षून सांगणे – स्पष्टपणे सांगणे
भानावर येणे – परिस्तितीची जाणीव होणे,शुद्धीवर येणे
ज्याचे नाव ते असणे – उपमा देण्यास उदाहरण नसणे
साशंक होणे – शंका येणे
दक्षता येणे – काळजी घेणे
डोळे वटारणे - रागाने बघणे
पोटात कावळे ओरडणे – भुकेणे व्याकूळ होणे
फटफटणे – सकाळ होणे
चिटपट करणे – कुस्तीत हरविणे
उसंत मिळणे – वेळ मिळणे
जीव वरखाली होणे – घाबरणे
अंगावर काट येणे  - भीती वाटणे
बाजारगप्पा – निंदा नालस्ती
धिंडवडे निघणे – फजिती होण
कच्छपी लागणे – नादी लागणे
कुणकुण लागणे – चाहूल लागणे
डोळे लाऊन बसने – खूप वाट पाहणे
जिवाची मुंबई करणे – अतिशय चैनबाजी करणे
धारवाडी काटा – बिनचूक वजनाचा कट
अठरा गुणांचा खंडोबा – लाबाळ माणूस
पोटात ठेवणे – गुप्तता ठेवणे
अंगी तथा भरणे – मगरुरी करणे
अंगाला होणे – अंगाला छान बसने
योगक्षेम चालविणे – रक्षणाची काळजी वाहने
मिश्यांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे
काळ्या दगडावरची रेघ – खोटे न ठरणारे शब्द 
गढून जाणे – मग्न होणे , गुंग होणे
कणव असणे – आस्था किंवा करुणा असणे
हातभार लावणे – सहकार्य करने
पुढाकार घेणे – नेतृत्व करणे
कटाक्ष असणे – कल असणे ,भर असणे ,जोर असने
बांधणी करणे – रचना करणे
भरभराट होणे – प्रगती होने
वंचित राहणे – एखादी गोष्ट न मिळणे
बडेजाव वाढवणे – प्रौढी मिरवणे
काळजी घेणे – चिंता वाहने
हेवा वाटणे – मत्सर वाटणे
समजूत काढने – समजावने
खंड न पडणे – एखादे कार्य करतांना मध्ये न थांबणे
ताटकळत उभे राहणे – वाट पाहणे
उपोषन करणे – लंघन करणे
लवलेश नसणे – जराही पत्ता नसणे
पहारा देने – राखण करणे
गट्टी जमणे – दोस्ती होणे
नजर वाकडी करणे – वाईट हेतु बाळगणे
भान ठेवणे – जाणीव ठेवणे
बाहू स्फुरण पावणे – स्फूर्ति येणे
प्रघात पडणे – रीत असणे
काळ्या पाण्याची शिक्षा – मरेपर्यंत कैद होणे
परिसीमा गाठणे – पराकोटीला जाणे
प्रभावित होणे – छाप पडणे
आयोजीत करणे – सिद्धता करणे
पार पडणे – संपवणे
भरारी मारणे – झेप घेणे
पसंती मिळणे – अनुकूलता लाभणे
जम बसने – स्थिर होणे
तारांबळ होणे – घाईगडबड उडणे
अप्रूप वाटणे – कौतुक वाटणे
वारसा देणे – हक्क सोपवणे
नाळ तोडणे – संबंध तोडणे
आडाखे बांधणे – मनात आराखडा किंवा अंदाज करणे
छातीत धस्सदिशी गोल येणे – अचानक खूप घाबरणे
परिपाठ असणे – नित्य क्रम असणे
ठाण मांडणे – एक जागेवर बसून राहणे
विरस होणे – निराश होणे
चाहूल लागणे – मागोवा लागणे
सुड घेणे –   बदला घेणे
धडपड करणे – खूप कस्ट करणे
ग्राह्य धरणे – योग्य आहे असे समजणे
प्रतिष्टापित करणे – स्तापणा करणे
अमलात आणणे - करवाई करणे
दप्तरि दाखल होणे – संग्रही जमा होणे
चक्कर मारणे – फेरफटका मारणे
ठसा उमटवणे – छाप पाडणे
प्राचारात आणणे – जाहीरपणे माहिती देणे
घोकमपट्टि करणे – अर्थ लक्ष्यात न घेता पाठ करणे 
धास्ति घेणे – घाबरने
हसता हसता पोट् दुखणे – खूप हसणे
कापरे सुटणे - घाबरल्यामुळे थरथरणे 
डोळ्याला डोळा न भिडवने – घाबरून नजर न देणे
विपर्यास होणे – असंगत अर्थ लावणे
आंबुण जाणे – विटून जाणे
लळा लागणे – ओढ लागणे
आवर्जून पाहणे – मुद्दामहून पाहणे
मती गुंग होणे –आश्चर्य वाटणे
प्राणाला मुकणे – जीव जाणे
तोंड देणे – मुकाबला करणे
रोष ठेवणे – चीड येणे
ललकारी देणे –जयघोष करणे
अभंग असणे –अखंड असणे
उत्पात करणे – विध्वंस करणे
उदास होणे – खिन्न होणे
देखरेख करणे – राखण करणे
भ्रमण करणे – भटकंती करणे
पदरी घेणे – स्वीकार करणे
बेत करणे – योजना आखणे
प्रक्षेपित करणे – प्रसारित करणे
बत्तरबाळ्या होणे – नासधूस होणे
खपणे – कष्ट करणे
चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे – अनाथ करणे 
हंबरडा फोडणे – मोठ्याने रडणे
देहातून प्राण जाणे – मरण येणे
वणवण करणे - खूप भटकणे
डोळ्यास धारा लागणे – रडणे
भडभडून येणे - हुंदके देणे
दिस बुडून जाणे – सूर्य मावळणे
वजन पडणे – प्रभाव पडणे
हशा पिकणे – हास्यस्पोट होणे
मुखोद्गत असणे – तोंडपाठ असणे
टिकाव लागणे - निभाव लागणे
अभिलाषा धरणे – एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे
झुंज देणे – लढा देणे
प्रतिकार करणे – विरोह करणे
व्रत घेणे – वसा घेणे
अंगी बानणे – मनात खोलवर रुजणे
विसावा घेणे – विश्रांती घेणे
दडी मारणे – लपून राहणे
पाळी येणे – वेळ येणे
डोळे फिरणे – खूप घाबरणे
देखभाल करणे – जतन करणे
रवान होणे – निघून जाणे

Post a Comment

0 Comments

close