शब्दांच्या जाती - क्रियापद आणि प्रकार | Marathi Grammar verb kriyapad | Mpscpoint

Hello welcome to mpscpoint.in website. I am going to provide Marathi Grammar Vyakaran Kriyapad notes/information in Marathi for study of various competitive exams in Maharashtraक्रियापद 

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ - तो हसतो.

वरील उदाहरणांमध्ये हसतो हा क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे, त्यामुळे हसतो हे वरील वाक्यातील क्रियापद आहे. क्रियापदाचे शिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही कारण तो वाक्यातील मुख्य शब्द आहे असतो म्हणून त्याला मुख्यपद असे देखील म्हणतात.

क्रियापद हे धातू आणि प्रत्यय मिळून तयार होत असते. म्हणून क्रिया पदांमध्ये धातूला अत्यंत महत्त्व आहे.

क्रियापदतील धातू म्हणजे नेमकं काय?

हसतो (क्रियापद) , हस (धातू)

खेळतो (क्रियापद) , खेळ (धातू)

-धातु म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द.

-धातू मध्ये लिंग वचन पुरुष काळ व अर्थानुसार बदल होत असतात त्यामुळे ही शब्द जाती विकारी आहे.


क्रियापदांचे प्रकार (Types of verb in Marathi)

क्रियापदांची विविध प्रकार खालील प्रमाणे:

1. स्थिती व स्थित्यंतर दर्शक क्रियापद

कर्त्याचे स्थित्यंतर किंवा स्थिती दर्शवणारे शब्दांना क्रियापदे असे म्हणतात. जे आहे ते दर्शनी म्हणजे स्थिती तर एकातून दुसऱ्यात बदल करणे म्हणजे स्थित्यंतर होय.

 1. चंद्रगुप्त राजा होता.
 2. मी शिक्षक आहे.
 3. तू वकील झाला.


2. सकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज भासते त्या सकर्मक क्रियापद म्हणतात.

 1. गरुड साप पकडतो.
 2. आजोबा एक गोष्ट सांगतात.

वाक्यामध्ये सकर्मक क्रियापद आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी तुम्ही एक पद्धत वापरू शकता, कर्त्याला ने प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करून बघायची, जर ते भूतकाळी होत असेल तर वाक्य सकर्मक समजावे आणि होत नसेल तर अकर्मक समजावे.

जसे वरील पहिल्या वाक्य चे भूतकाळी रुप - गरुडणे साप पकडला.

परंतु या पद्धतीला काही अपवाद आहे पुढील उदाहरणे बघा.

राजाला मुकुट शोभतो.

मुकुटणे राजा शोभला.


3. अकर्मक क्रियापद

ती मोठ्याने हसली

तू रणांगणावर पडला.

मला आंबा आवडतो.

वरील उदाहरणांमध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज भासत नाही म्हणून ती अकर्मक क्रियापदे आहेत.


4. द्वीकर्मक क्रियापदे

ज्या वाक्यातील क्रिया कर्त्या कडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते,अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.  

 1. मुलीने राजाला मुकुट दिला.  
 2. गुरुजींनी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविले.  

अशाच प्रकारे वाक्यात दोन कर्मे असतील, तर त्यांचे खालील प्रमाणे दोन प्रकार पडतात प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म.

प्रत्यक्ष कर्म मध्ये वस्तू वाचक कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणतात गणित पिशवी

अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्म म्हणतात.


5. उभयविध क्रियापदे

जे क्रियापद सकर्मक & अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जाते, त्याला उभयविध क्रियापद म्हणतात.

 1. त्याने बोट कापले.
 2. त्याचे बोट कापले.


6. संयुक्त क्रियापदे

धातुसाधित + सहाय्यक क्रियापद = संयुक्त क्रियापद 

उदाहरणार्थ -

मुले खेळू लागली.

तो गात आहे.

वरील शब्दांमध्ये खेळू आणि गात हे धातू आहेत. त्यांना जोडून सहाय्यकारी क्रियापद आले आहे म्हणून वरील उदाहरणातील क्रियापदे संयुक्त क्रियापदे म्हणून ओळखले जातात.


7. सिद्ध क्रियापद

क्रिया पदांमधील मूल धातूला सिद्ध धातू असे म्हणतात, अशा धातूला प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदानना सिद्ध क्रियापद असे म्हणतात.

जा - जातो, उठ - उठतो


8. साधित क्रियापद

नाम विशेषण क्रियापद व अव्यय अशा विविध जातींच्या शब्दापासून तयार होणारे धातूंना साधित धातू असे म्हणतात अशा साधीत धातू पासून बनलेल्या क्रियापद यांना साधित क्रियापद असे म्हणतात.


9. प्रयोजक क्रियापद

वाक्यातील एखादी क्रिया करण्यासाठी जर बाह्य घटक प्रेरित करत असतील, तर अशा क्रियापदास प्रयोजक क्रियापद म्हणतात.

 1. मुलाला हसवी तो.
 2. आई मुलाला निजविते.
 3. नितीन कुत्र्याला पळवतो.


10. शक्य क्रियापद

एखादी क्रिया करणे कर त्याला शक्य आहे, असे ज्या क्रियापदावरून व्यक्त होते त्याला शक्य क्रियापद म्हणतात.

 1. मला आता खाववते.
 2. आता कुत्र्याला पलवते.


११. अनियमित किंवा गौण क्रियापद

ज्या क्रियापदांमधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही त्यांना नियमित क्रियापदे म्हणतात.

 1. तसे वागणे बरे नाही. 
 2. येथे जाऊ नको.


12. भावकर्तृक क्रियापद

गावी जाताना घराकडे उजाडले.

आज दिवसभर सारखे गडगडतेय.


13. करण रूप क्रियापद

 1. नेहमी खरे बोलावे.
 2. सतत अभ्यास करावा.


14. अकरणरूप  क्रियापद

 1. कधीही खोटे बोलू नये. 
 2. उन्हात फिरू नका.
     अशाप्रकारे क्रियापदांचे प्रकार पडतात. वरील माहिती वेळोवेळी अपडेट करण्यात येईल, पोस्ट कशी वाटली कमेन्ट करायला विसरू नका. धन्यवाद.! 

Post a Comment

0 Comments